कमल घोडकेंच्या हाती टोणेवाडी ग्रामपंचायतीची दोरी!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

जत तालुक्यातील टोणेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कमल संभाजी घोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या जत तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत टोणेवाडी हे एकमेव गाव बिनविरोध झाले आहे.मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी नव्यानेच निवडुन आलेल्या सदस्यांची प्रथम सभा घेऊन येथील सरपंचपद रिक्त असल्यामुळे उपसरपंच यांना कार्यभार देण्यात आला. तसेच आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
टोणेवाडी येथे आरक्षण चुकीचे झाले आहे.त्यामुळे जनतेच्या मनात सरपंचपदाची उत्सुकता होती. आज टोणेवाडी गावात उपसरपंचाची बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी नूतन उपसरपंच सौ. कमल घोडके म्हणाल्या कि,टोणेवाडी गावातील रस्ते,पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ. यासाठी टोणेवाडी गावातील सर्व विकास कामाबद्दल ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंडळ अधिकारी बुकठे, तलाठी नागेश वाघमोडे,ग्रामसेवक सुदर्शन जाधव,गोरख टोणे, आप्पासाहेब टोणे, विष्णू नुलके,उत्तम नुलके,अशोक नुलके,पत्रकार नितीन टोणे,ज्ञानेश्वर घोडके,रमेश घोडके,संभाजी चव्हाण, अनिता टोणे,चागुना नुलके, वसंत टोणे, वैशाली हिप्परकर, तुकाराम व्हलगुळे, इंदाबाई नुलके आदीसह टोणेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.