अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार विक्रम सावंत यांनी मुंबई येथे सत्कार केला.यावेळी जत तालुक्यातील विविध प्रश्न,पक्षाचे संघटन, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयावर आ.सावंत व आ. पटोले यांच्यात चर्चा झाली.
आमदार नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी जत तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावले. यापुढे तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन नाना पटोले यांनी केले. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या वाढीसाठी आपल्या नेतृत्वाखाली नेटाने काम करू असे अभिवचन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिले.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन