उमराणीच्या डफळे पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी राहूल जाधव

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील उमराणी येथील मातोश्री कुसुमताई विक्रमसिंह डफळे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी जत दूरदर्शन केबल नेटवर्कचे संचालक राहूल राजन जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
या संस्थेचा वर्धापनदिन नुकताच झाला. त्यावेळी राहूल जाधव यांची निवड करण्यात आली. संस्थेचे संचालक अमरसिंह इंगोले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते अप्पासाहेब नामद होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहूलसिंह डफळे उपस्थित होते. राहूल जाधव यांच्या बरोबरच डॉ. विनायक शिंदे, शंकर भीमा माळी या तज्ञ संचालकांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अमरसिंह डफळे यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर नूतन उपाध्यक्ष उध्दवराव डफळे यांची निवड करण्यात आली. यावेळी सचिव अनिल शिंदे, शिवानंद पाटील, संचालिका मीनाक्षी अभंगे, अलगोंडा बिराजदार, उमेश पवार, वीरधवल डफळे, सीताराम जोशी, ऋतूजा डफळे,यल्लाप्पा अभंगे उपस्थित होते.