आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आधार स्वयंसहाय्यता बचत गट, आटपाडी या संस्थेच्या स्थापनेला १०० महिने पूर्ण होऊन १०१ व्या महिन्यात पदार्पण सोहळा व विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले.


बंडोपंत देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.विटा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय बालटे,रघुनाथ लिगाडे, डॉ.सप्तेश जाधव,अभिनेते रविकिरण जावीर,आबासाहेब आवटे,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हरी रावळ, प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांची प्रमुख उपस्थिती होती.


अध्यक्ष बंडोपंत देशमुख, डॉ.सप्तेश जाधव,संजय बालटे,व्ही.एन.देशमुख,कार्यवाह अरविंद चांडवले,जीवन पोळ,रविकिरण जावीर,डॉ.जयंत चव्हाण-पाटील,आदींनी मनोगत व्यक्त केले.


नूतन अध्यक्ष स.नि.चव्हाण, कार्यवाह अरविंद चांडवले,सचिव किरण खंदारे,सहसचिव गणेश बुचडे, संचालक दिलीप पवार,व्ही.एन.देशमुख,संपत कुंभार तसेच व्ही.एन.देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.


व्ही.एम.देशमुख यांनी प्रास्ताविक केले.स्नेहजित पोतदार यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तसेच आभार मानले.नंदकुमार राक्षे, संतोष हंचे,दिपक मोकाशी,शेखर जाधव,संजय पाटील, दत्तात्रय पाटील,आदि उपस्थित होते.