सत्तेसाठी उतावीळ विरोधकांचे स्वप्न दिवास्वप्नच राहणार:माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यात बिगुल वाजणार म्हंटल्यावर दहा वर्षापासून सत्तेपासून वंचित राहिलेल्या विरोधकांनी नेहमीप्रमाणेच शिक्षक बँकेवर नाहक टीका करणे,बदनामी करणे असे नेहमीचे उद्योग सुरू केले आहेत. परंतु त्यांची ही नौटंकी शिक्षक समितीच्या पारदर्शक कारभारामुळेच सुज्ञ सभासद उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत आणि त्यांचे सत्तेचे स्वप्न यावेळीसुद्धा दिवास्वप्नच राहणार. त्यामुळे उतावीळ झालेल्या विरोधकांनी बेताल आरोप करण्यापेक्षा शिक्षक बँकेने घेतलेले हिताचे निर्णय सभासदांना सांगितले तर नक्कीच कामधेनुचा गौरव होईल,असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव यांनी आटपाडी येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या बैठकीत केले.
विरोधकांच्या काळात 21 टक्के कर्जाचा व्याजदर होता.तो आम्ही टप्प्याटप्प्याने कमी केला असून १६ लाख रुपयेपर्यंत समान हप्ता कर्जाचा व्याजदर ११.५ % तर जामिनकी कर्ज व्याजदर १३ % पर्यंत खाली आणला आहे. शिवाय आणखी दिलासा देण्याचा शिक्षक समिती नेतेमंडळी व संचालकांचा मानस असून सुज्ञ सभासद शांत व समाधानी आहेत. फक्त विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची स्वतःचे स्वप्न पुर्तीसाठी कोल्हेकुई सुरू आहे.हे सर्वजण जाणून आहेत.
शिवाय मासिक कायम ठेवी परत करणे, लाखो रुपयांची स्टँप ड्युटी कमी करून हजारो सभासदांना न्याय दिला आहे. मृत संजीवनी ठेव योजनेच्या माध्यमातून 20 लाखापर्यंतची कर्जमाफी देऊन अनेक दुःखितांचे अश्रू पुसण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.
विरोधकांनी इतिहासात एकदा तरी कर्जाचा व्याजदर कमी केल्याचा पुरावा द्यावा, मगच व्याजदरावर तोंड उघडावे.त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. सत्तेसाठी भुकेलेले तोंडसुख घेत आहेत हे सर्वज्ञात आहे.आम्ही आजपर्यंत सभासदांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व तो इथून पुढेही चालूच ठेवणार आहोत.त्यामुळे तुम्ही आमची चिंता करू नका, तुमच्या अस्तित्वाचीच चिंता  करा .अलीकडे सोलापूरचे सभासद करताना विरोध करणाऱ्यांचा कंठ सोलापूरकरांवरच्या दिखाऊ प्रेमामुळे फुटु लागला आहे. हेही ते सभासद जाणून आहेत. तुमचा योग्य वेळी ते सभासद करेक्ट कार्यक्रम करूनच हिसका दाखवणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीतही  हाती काहीही लागणार नाही याची खात्री झाल्याने ते भयभीत व सैरभैर झाले आहेत.
यावेळी तालुका अध्यक्ष शामराव ऐवळे,सरचिटणीस प्रवीण बाड,शिक्षक नेते दीपक कुंभार, संजय कबीर ,अजय राक्षे, विश्वास पुजारी ,धनाजी देठे ,सिद्धार्थ कटरे , श्रीकांत कुंभार, बाबासाहेब शेख, हैबतराव पावणे,सत्यजित भांबुरे, हरिदास जावीर, जोतीराम सोळसे, वामन सोळंकी, भास्करराव डिगोळे, यशवंत मोरे, सत्यवान माने, आदी पदाधिकारी उपस्थित होते.