संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस ग्रामशाखेचे उद्घाटन केंद्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिया नागणे,मार्गदर्शिका अक्काताई माने,पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र पवार तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्ष वनिता कोरटकर यांचे हस्ते झाले. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला.नवनिर्वाचित जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष यांनी सर्व समाजातील महिलांना एकत्र करून चांगल्याप्रकारे सामाजिक उपक्रम राबविणार असलेचे सांगितले.तसेच केंद्रीय सदस्य प्रिया नागणे यांनी जिजाऊ ब्रिगेड या संघटनेविषयी माहिती दिली .
माळशिरस शहर शाखेच्या अध्यक्ष म्हणून नीलम घाडगे यांची ,सचिव पदी भाग्यश्री चव्हाण,कार्याध्यक्ष पदी शुभांगी घाडगे,उपाध्यक्ष पदी उषा खराडे यांच्या निवडी करून प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. केंद्रीय कार्यकारिणी सदस्या हेमा मुळीक,संगीता शिंदे,नंदिनी गायकवाड,माळशिरस येथील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित होत्या.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन