संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूण लाड यांचे उद्या माळशिरस येथे संत सावतामाळी मंगल कार्यालय माळशिरस येथे 6 फेब्रुवारी रोजी संकाळी 11वाजता तालुक्यात आगमन होत असुन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.तसेच पदवीधरांची बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहान करण्यात आले आहे. सर्व जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,नगरसेवक,सरपंच ,ग्रां.प.सदस्य व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार पहिल्यांदाच येत असल्याने त्यांचा नागरी सत्कार माळशिरस तालुक्याच्या व पदवीधर यांच्यावतीने माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील पदवीधरांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे. तरी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था, दूध संस्था, मजूर संस्था, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सभासद व पदवीधर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक मारुतीराव उर्फ आप्पासाहेब देशमुख यांनी संयोजन समितीच्या वतीने केलेले आहे.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन