प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी अमित किसन ऐवळे यांची निवड करण्यात आली आहे.सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी या निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने आटपाडी तालुक्यातील अमित किसन ऐवळे यांची सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश दिनकरराव पाटील यांनी 26 जानेवारी रोजी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.पक्ष बळकटीकरणासाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी,पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.दरम्यान या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन