प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कवठेमहांकाळ:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करलो-टी ता. कवठेमहांकाळ येथे म्हैशाळ येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजू जानकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव प्रा.नारायण खरजे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राघवदादा मेटकरी, नवनिर्वाचित सदस्य शहाजी एडके, मारुती बंडगर, सौ. सुजाता बंडगर, सौ.शितल बंडगर, सौ।रोहिणी पाटील उपस्थित होते.तसेच प्रविण दडस,अरूण ऐडके, सचिन चव्हाण करोली, शाहरुख मुजावर, अमोल मोटे, अरूण पाटोळे, विकी माने व आदि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. सर्वसामान्य कुटुंबातील तरूणांना संधी दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी व उपस्थितांमध्ये आनंद दिसत होता. हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच दिसून येते,असे ठाम मत उपस्थित पदाधिकारी यांनी व्यक्त केले.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन