जत तालुक्यातील टोणेवाडी एकच ग्रामपंचायत बिनविरोध
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढती उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाल्या आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ३१७ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यात टोणेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध व लमांणतांडा(उटगी) सात पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या तर तब्बल ३२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
अनेक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठीच्या निवडणूकीचे उमेदवारी अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या २७८ जागांसाठी आता ५४० जण लढणार आहेत.सोमवारी माघारीनंतर तालुका
प्रशासनाकडून उमेदवारांना चिन्हेही वाटप करण्यात आली आहेत. तीस ग्रामपंचायतीपैंकी २८ ग्रामपंचायतीसाठी दुंरगी,तिंरगी लढती होणार आहेत.या ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. सोमवारी या गावातील उमेदवार बिनविरोध झाले,अंकलगी १,जालिहाळ खुर्द
१, लमाणतांडा(उटगी) ६, लमाणतांडा
(दरिबडची)६, मोरबगी १,सोनलगी१, तिकोंडी ८, टोणेवाडी ७ असे ३२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यातील टोणेवाडी पूर्णत: तर लमाणतांडा (उटगी) येथे सात पैकी सहा जागा अशा दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर तिकोंडी, लमाणतांडा(दरिबडची) या ग्रामपंचायती बिनविरोध होण्यात थोडक्यात चुकल्या आहेत. दरिबडचीत 3 तर लमाणतांडा (दरिबडची)१ जागेसाठी निवडणूक होत आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या घोषणेला दोन गावातील जनतेनी दाद दिली आहे असे म्हणता येणार नाही. कारण दरवेळी पाच-सहा ग्रामपंचायती बिनविरोध होत होत्या. आता केवळ दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन