प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंतराव पाटील यांनी दाखवला सर्वसामान्य होतकरू कार्यकर्त्यांवर विश्र्वास
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते अॅड.माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व वैभवदादा पाटील यांचे कार्यकर्ते चांगले संभाषण कौशल्य व संघटन कौशल्य असणारे सर्वसामान्य कुटुंबातील सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी प्रा.नारायण खरजे यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वर्पे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गेली बरीच वर्षे शहरी भागात चांगले सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कौशल्य असणारे प्रा.खरजे यांना योग्य न्याय मिळाला आहे. ग्रामीण भागातील एक उच्चशिक्षित प्रामाणिक तरूण एका योग्य दिशेने चांगल्या प्रतीचे काम करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे,असे मत खरजे व मित्रपरिवार यांचे आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिकपणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या पदाची जबाबदारी दिली, यामुळे सर्व थरातून आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. नक्कीच मिळालेल्या संधीचे सोने करू असे निवड झालेल्या पदाधिकारी यांनी मत व्यक्त केले.
राजारामनगर इस्लामपूर येथे लोकनेते स्व. राजाराम(बापू) पाटील यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सांगली जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन वर्षाची व कार्याची सुरुवात केली. नवनिर्वाचित राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीसपदी राजूशेठ जानकर व सचिवपदी प्रा.नारायण खरजे यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.वाळवा तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, अवधूत कस्तुरे,प्रा. प्रविण गावडे, बिरू भाऊ केसकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन