जत तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी उभी करणार:पालकमंत्री जयंत पाटील

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे,निरनिराळे उद्योग उभे राहण्यासाठी तालुक्यात लवकरच पंचतारांकित एमआयडीसी उभी करणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
जत शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क कार्यालय
सुरू केल्यापासून मंत्री पाटील प्रथमच कार्यालयास भेट दिली.यावेळी जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी जत नगरपरिषदेचे गटनेते स्वप्नील शिंदे यांची निवड जाहीर केली. निवडीचे पत्र मंत्री पाटील यांच्याहस्ते शिंदे यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील,जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक,बाळासाहेब पाटील, तालुका कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण,माजी सभापती सुरेशराव शिंदे,उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, बसवराज धोडमणी,सिधुअण्णा शिरसाड, जे.के. माळी, प्रवीण जाधव उपस्थित होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, जत तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.तो मी सोडविणार आहे.त्याशिवाय बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी पंचतारांकित एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन वाढवावे.युवक,अबालवृधापर्यत राष्ट्रवादीचे विचार पोहचवा असे आवाहन ना.जयंत पाटील यांनी केले. यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सूर खतीब,तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण,हेमंत खाडे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.