स्वप्नील शिंदे यांची राष्ट्रवादीच्या जत युवक तालुकाध्यक्ष पदी निवड

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व गटनेते स्वप्नील सुरेश शिंदे यांची पाटबंधारे मंत्री व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
पालकमंत्री जयंत पाटील हे गुरुवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी स्वप्नील शिंदे यांची निवड जाहीर करून त्यांना पत्र देउन सत्कार केला.