सुशिक्षित तरुणांनी विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय व्हावे: विक्रम ढोणे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

सध्या जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र गावातील सुशिक्षित तरुणाने गावाच्या विकासासाठी व गावाचे रूप बदलण्यासाठी उदासीन न राहता ग्रामपंचायत निवडणूकीत सक्रिय व्हावे असे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केले.
ढोणे म्हणाले की, गावाच्या विकासासाठी सुशिक्षित तरुणांनी पुढे आले पाहिजे .तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती भ्रष्ट कारभारामुळे विकासापासून दूर गेल्या आहेत. गाव पुढाऱ्यांचे व्यक्तीद्वेष भावकीचे ईषेमुळे गावचा विकास खुंटला आहे. व्यक्तीच्या पलीकडे पक्ष व पार्टी पेक्षा गावचा विकास झपाट्याने होणे गरजेचे आहे .
गावाच्या विकासासाठी कायम राजकारण करणाऱ्या गाव पुढार्‍यांनी अहंकार बाजूला ठेवून सुशिक्षित तरुणांना या ग्रामपंचायत निवडणुकीत संधी दिली पाहिजे. इतर तालुक्याच्या तुलनेत आपल्या तालुक्यातील गावांचा विकास काही नाही.त्यामुळे तरुणाने या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन एक विकासाचा पाऊल टाकावं यासाठी माझे सहकार्य नक्कीच राहील असे आवाहन शेवटी त्यांनी केले.