अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील काशिलिंगवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.संगिता नामदेव नरळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन उपसरपंच सौ.नरळे म्हणाल्या, काशिलिंगवाडी गावाच्या विकासासाठी कायम तत्पर राहील. जनतेला चांगली सेवा उपलब्ध करून देणार,आर्दश गाव करण्याचा माझा कायम मानस आहे.यावेळी सरपंच आण्णासो कुटे,ग्रामसेवक अर्चना खिलारे, माजी उपसरपंच दत्तात्रय नरळे,बाळासाहेब मुटेकर,चेअरमन महावीर नरळे, शरद हिप्परकर,अध्यक्ष मच्छिंद्र कुटे, सदस्य माया हिप्परकर, अनिता कोळी, अंजना कदम व विठ्ठल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन