धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा माळशिरसमध्ये निषेध

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

मुंबई येथे चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षणाबाबत निवेदन देण्यासाठी धनगरी पेहरावात विधानभवनामध्ये जात असताना प्रशासनाने त्यांना गेटवर आडवून धनगराचे भूषण असणारा ढोल हिसकावून घेतला.त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी नायब तहसीलदार तूषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बाळासाहेब सरगर,सोपान नारनवर, बाळासाहेब वावरेे,नागेश वाघमोडे,युवराज वाघमोडे,दादासाहेब खरात,गणेश वगरे,आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने पुर्वी लागू केलेल्या महामेष शेळी मेंढी खरेदी योजनेसह 22 योजना देवेंद्र फडणवीस सरकारने लागू केल्या होत्या.धनगर जमातीच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद केली होती.त्यापैकी एक रुपया या सरकारने खर्च केला नाही व धनगर आरक्षणाबाबत एका वर्षांमध्ये एक बैठक अथवा एक चकार शब्दसुद्धा काढला नाही. याचा निषेध म्हणून हे निवेदन देण्यात आले.
यापूर्वी भाजप सरकार सत्तेमध्ये असताना अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे हे धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी धनगरी पेहरावात विधानभवनामध्ये प्रवेश करून निवेदन दिले. परंतु त्यांना त्यावेळी प्रशासनाने आडवले नाही. आज मात्र गोपीचंद पडळकर यांची अडवणूक करून हे सरकार धनगर समाजाची जाणून-बुजून अडवणूक करत असल्याचे दिसत आहे असे म्हटले आहे.