डी.आर.वानखडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
शिराळा(जि.अमरावती):
शिराळा परिसरातील मागील वर्षी एप्रिल,मेमध्ये ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाल संपला होता, पंरतु लाॅकडाऊनमुळे निवडणुका होवु शकल्या नाहीत.त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.
अमरावती जिल्हातील ५५३ ग्रामपंचायतची निवडणुक होणार आहे. १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी डिसेबरपासून आचारसंहिता लागु झाली आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिंसेबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील.त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणुक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन