गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजप तळागाळापर्यंत पोहोचली : बाळासाहेब सरगर

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी आज माळशिरस येथे केले.
येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते .
या कार्यक्रमाला भाजपा तालुका सरचिटणीस संजय देशमुख,मोटेवाडीचे सरपंच दादासाहेब खरात, युवानेते युवराज वाघमोडे,नगरसेवक आकाश सावंत, बालाजी नरळे,गणेश सीद, तुळशीराम घुले,राहूल बंडगर आदी उपस्थित होते.
सरगर म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही दोन खासदारांची पार्टी शहरी भागापुरती मर्यादित होती. परंतु गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत जाऊन आज 302 खासदारांची पार्टी म्हणून देशात एक नंबरला आहे. म्हणून मुंडे साहेबांचे काम हे आजच्या भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आहे .1995 साली काढलेल्या संघर्षयात्रेमुळे महाराष्ट्र राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले.तेव्हापासून भाजपला राज्यात वैभव प्राप्त झाले.त्याचे श्रेय मुंडे साहेबांना जाते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज वाघमोडे यांनी केले.