गोरडवाडी येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर,राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष बाबासाहेब माने, माजी सरपंच किरण माने, तानाजी रणनवरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
माजी सरपंच भिकाजी गोरड, सरपंच रामचंद्र गोरड, रोहित पवार विचार मंचाचे प्रदेश सचिव प्रा.मच्छिंद्र गोरड,पै.पांडुरंग पिसे,चेअरमन खंडू कळसुले-पवार , माजी सरपंच भागवत कर्णवर,माजी चेअरमन संतोष गोरड,विष्णू गोरड,दिपक आबा गोरड,जगन्नाथ गोरड,काका गोरड,भारत सरगर,संजय सरगर,दयानंद यमगर,जांगिर शिकलकर,दत्तू कोळेकर, रफिक शिकलगार,काका आवळे,गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.