अ.भा.वारकरी मंडळाच्या तालुका कोषाध्यक्षपदी ह.भ.प. सुरेश महाराज पुजारी यांची निवड

पोपट वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या आटपाडी तालुका कोषाध्यक्षपदी लिंगीवरे येथील ह.भ.प. सुरेश महाराज पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष ह.भ.प. नंदू महाराज पवार तडसर यांनी दिले. तालुकाध्यक्ष ह.भ.प.अनिल महाराज दुबुले तडवळे, जिल्हा आरोग्य समिती सचिव ह.भ.प. सचिन महाराज कुंभार दिघंची , दिघंची ग्रामसमितीचे अध्यक्ष फडतरे बापू,बाबासाहेब पुजारी लिंगीवरे उपस्थित होते.