प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /बदलापूर:
कणकवली-सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या जीवन स्त्रोत या संस्थेच्या अध्यक्षा व मनोवेधा ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ.शितल मांजरेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जनजागृती सेवा समितीच्यावतीने”सन्मानपत्र”देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शितल मांजरेकर यांनी आपल्या जीवन स्त्रोत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पणंदुर येथील अनाथ आश्रमात लाॅकडाऊनच्या काळात कपडे व खाऊ वाटप केले.पुर परिस्थितीत अन्न धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.इतर सामाजिक उपक्रम त्या राबवित असतात.सन्मानपत्र प्रदान करताना जीवन स्त्रोतच्या अक्षता गावडे,नम्रता सरंगले,मेघा चौघुले,पल्लवी जाधव,साक्षी पवार,हिना गावडे, समिता तांबे,शिल्पा नार्वेकर,सायली साबळे,रेखा चव्हाण या उपस्थित होत्या.सन्मानपत्राने गौरव झाल्या कारणाने शितल मांजरेकर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु