काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने ऑनलाईन काव्यसंमेलन

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:

काव्यप्रेमी शिक्षक मंच शाखा सांगली व कोल्हापूर जिल्हा मार्फत दि. २७/१२/२०२० रोजी ऑनलाईन काव्यसंमेलनाचे आयोजन करणेत आले आहे. जिल्हा समितीच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने करण्यात आले आहे. या संमेलनात काव्य आणि गझल सादरीकरणाच्या स्वतंत्र सत्राचे नियोजन केलेले आहे.
या काव्यसंमेलनात नाव नोंदणी करताना – स्वतःचे पूर्ण नाव,वॉटसॕप मोबाईल नंबर, जिल्हा , कविता की गझल सादरीकरण करणार या चार गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करावा.
सर्व सहभागी कवींना मंचामार्फत सहभाग प्रमाणपत्र देणेत येईल. नावनोंदणी दिनांक १२/१२/२०२० अखेर रात्री १२ पर्यंत करावी. नावनोंदणीसाठी संपर्क कवयित्री सौ. स्मीता दोशी (9404298933) यांना करावा असे आवाहन काव्यप्रेमी शिक्षक मंचचे जिल्हा सांगलीच्या अध्यक्षा कवयित्री सौ.जस्मिन शेख आणि जिल्हा कोल्हापूरच्या अध्यक्षा कवयित्री सौ.पल्लवी पाटील यांनी केले आहे.
बैठकीस राज्याध्यक्ष आनंद घोडके, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात, जिल्हा कोषाध्यक्ष विजय पवार माणिकताई नागावे,जिल्हा सचिव मनिषा रायजादे, दिपाली चावरे उपस्थित होते.
सूत्रसंचलन योगिता काळे यांनी केले. आभार गजानन पाटील यांनी मानले.