विटा नगरपरिषदेच्यावतीने जागतिक शौचालय दिन साजरा

शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:

जागतिक शौचालय दिनानिमित्त विटा शहरातील नवी भाजी मंडई येथील अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ शौचालय विटा नगरपरिषदेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शौचालय परिसरात रांगोळी, परिसर सुशोभित करण्यात आला.शौचालय वापराबाबतची शपथ घेण्यात आली. तसेच माझी वसुंधरा शपथ ग्रहण करण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, नितीन चंदनशिवे, ऐश्वर्या जोशी, अनंत जोशी व अन्य उपस्थित होते.