जतच्या डॉ.मुनीर तांबोळी मेमोरियल वेलनेस हॉस्पिटलमध्ये सर्व सोयींनीयुक्त ऍम्ब्युलन्स उपलब्ध

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत

जत तालुका विस्ताराने मोठा असून त्यामानाने हॉस्पिटलमधील सुविधा कमकुवत पडत असतात.याचे गांभीर्य लक्षात घेऊन जतचे प्रसिद्ध आर्थोपेडिक डॉ. मकसूद तांबोळी यांनी व डॉ.इजाज तांबोळी, मुदस्सर तांबोळी, सर्व सोयींनीयुक्त अशी जत तालुक्यात व शहरात प्रशस्त मोठी ॲम्बुलन्स गाडी तांबोळी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना म्हणाले की,तालुक्यात व शहरात कोणत्याही हॉस्पिटलमधून ॲम्बुलन्स हवी असेल त्यांना आम्ही 24 तास सेवा देऊ आणि योग्यप्रकारे सहकार्य करू. या गाडीमध्ये ऑक्सिजन, प्रशस्त मोठी गाडी हाडाच्या कोणत्याही पुढील समस्यासाठी नेण्यासाठी सोयींनीयुक्त गाडी असून याचा तालुक्यात लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे प्रतिपादन केले.
गाडी आल्यानंतर रेबिन कापून आनंकदोत्सव करण्यात आला. त्यावेळी विविध प्रतिष्ठित व्यापारी, मित्रपरिवार व हॉस्पिटलमधील सर्व स्टॉप,डॉक्टर वर्ग उपस्थित होते.