
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
भारतीय जनता पार्टी जत तालुका कार्यकारिणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाने आज जाहीर करण्यात आली. पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी जत तालुका सरचिटणीस पदी अंकले येथील शंकर वगरे सर यांच्या रूपाने जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कट्टर कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यकारणीत स्थान मिळाले आहे. संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिल्याने तालुक्यातील युवकांत अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
शंकर वगरे हे अंकले ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.वगरे सर यांचा पश्चिम भागात मोठा चाहता वर्ग आहे .सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अंकले या संस्थेच्या माध्यमातून पश्चिम भागात सहकाराचे जाळे विणले आहे . कार्यतत्पर लोकप्रतिनिधी, जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व, अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली, अभ्यासू व्यक्तीमत्व उत्तम वक्ता, प्रभावीपणे विषयाची मांडणी करण्याचे कौशल्य अशी शंकरराव वगरे यांची जनमानसात ओळख आहे.
शंकर वगरे सर यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, हे पद म्हणजे बहुमान नसून एक जबाबदारी आहे आणि या माध्यमातून परिश्रम घेऊन तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्याचे काम मी करणार आहे; तालुक्यातील गावोगावी भाजपा शाखा काढणार असून या माध्यमातून जनतेची अडी-अडचणी सोडवणार आहे. तसेच माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याने जतचे माजी आमदार विलासराव जगताप, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, तालुका अध्यक्ष सुनिल पवार व सर्वच वरीष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन