संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस आज पंढरपुर संपर्क कार्यालय या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते माळशिरस तालुका मनसे व्यापारी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी अमीत दोशी व माळशिरस शहर अध्यक्षपदी दिनेश पोरे यांची निवड करण्यात आली. त्यावेळी उपस्थित मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे,पंढरपुर तालुका अध्यक्ष शशीकांत पाटील, नगरसेवक अशोक वाघमोडे,तालुका मार्गदर्शक संतोष देवकाते,मनसे सहकार सेना तालुका अध्यक्ष संदीप सिद, तालुका उपाध्यक्ष बाबा ननावरे,शेतकरी सेना ता. उपाध्यक्ष पप्पुराजे तरंगे, संपत वळकुंडे,संजय वळकुंडे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना व्यापारी सेनेचे नुतन तालुका अध्यक्ष अमीत दोशी म्हणाले,व्यापारी बांधवाच्या न्याय हक्कासाठी लढणार राजसाहेब व दिलीप बापु यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण तालुक्यामध्ये मनसे व्यापारी सेनेचे जाळे वाढविणार आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन