दिघंची येथील पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसीला नॅशनल एज्युकेशनल एक्सल्लेन्स अँड कॉन्फरेन्स अवॉर्ड जाहीर

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:


दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्था संचलित पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास 2020 चा नॅशनल एड्युकेशनल एक्सल्लेन्स अँड कॉन्फरेन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.
बेंगलोर येथील रीसर्च इन्टेलिजीएनस प्रा.ली. यांच्या तर्फे ताज वेस्टएन्ड बेंगलोर या  ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य अमित ना. पानसकर यांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचे चेअरमन ईश्वरतात्या मोरे पाटील  व संस्थेच्या उपसंचालिका सौ. स्वातीताई मोरे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नॅशनल एड्युकेशनल एक्सल्लेन्स अँड कॉन्फरेन्स अवॉर्ड 2020 यामध्ये देशभरातून 350 हुन अधिक विद्यालये, अनेक शैक्षणिक संस्था यांनी आपला सहभाग नोंदवला होता. हा अवॉर्ड महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सोई सुविधा, सुसज्य लॅब्स, कॉम्प्युटर लॅब्स, यंत्र सामुग्री, सेमिनार हॉल तसेच अनुभवी प्राध्यापकवर्ग, महाविद्यालयाचा 100% निकाल व इतर शैक्षणिक व शैक्षणेत्तर कार्यक्रम यांची दखल घेऊन जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या या देदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.