कोसारी ग्रामीण विकास संस्थेतर्फे पाचवी शिष्यवृती परिक्षेत राज्यात सहावी आलेल्या समृद्धी भोसलेचा सत्कार

सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:

सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृती परिक्षेत समृद्धी संजय भोसले या विद्यार्थ्यांनीने 288पैकी 268गुण मिळवुन सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकात व राज्यात सहावा क्रमांक मिळवुन यशाच शिखर गाठले आहे.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 93.05%गुण मिळवुन राज्यात सहावा क्रमांक घेऊन घवघवीतपणे यश प्रदान केले आहे. राज्यस्तरीय शिष्यवृतीसाठी पाञ ठरली आहे. तिचे सर्वञ कौतुक होत आहे. ती सांगोला विद्यामंदीर सांगोला या ठिकाणी शिक्षण घेत आहे. संजय लक्ष्मण भोसले (गुरूजी)कोसारी, जिल्हा परिषद शाळा सोनंद येथे कार्यरत असलेले शिक्षक यांची समृद्धी ही कन्या आहे. तिला शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. समृद्धी राज्यस्तरीय शिष्यवृतीसाठी पाञ ठरल्याने तिचे सर्वञ कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राज्यात सहावी आलेली समृद्धी संजय भोसले हीचा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण विकास संस्थेच्या संचालिका सौ. मनिषा काळे यांच्या शुभहस्ते सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संजय भोसले (गुरूजी),लक्ष्मण भोसले सर,नानासो संकपाळ,दादासो महारनुर,वैभव तोरवे,शहाजीराजे भोसले,संस्थेचे अध्यक्ष.मा.श्री. विवेक टेंगले,सचिव,कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते. समृद्धीचा सन्मान करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.