अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ फलटण:
फलटण तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा असलेल्या आरडगांव केंद्राचे नियोजन व आराखडा तयार करून बौध्दिक व भौतिक विकासाचे रोल मॉडेल बनवुया, असे विचार आरडगांव केंद्राचे प्रयोगशील, तंत्रस्नेही केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी जिल्हा परिषद शाळा चव्हाणवाडी येथे मुख्याधापक व शिक्षक शैक्षणिक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नारायण सपकाळ होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख अनिल कदम व केंद्रप्रमुख सौ. प्रमिला रणवरे यांचा उत्कृठ शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजा बदल आरडगांव केंद्रसमुहा मार्फत शाल, श्रीफळ व मानाचा कोल्हापूरी फेटा बांधून यथोचित गुणगौरवपर सत्कार नारायण सपकाळ व महिपती कुचेकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी अनिल कदम म्हणाले की, बालकांचे शिक्षणासाठी ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक कामकाज शिक्षक तन- मन-धन अर्पन करून पालकाचे सहकार्याने प्रभावी व यशस्वपणे करत आहेत. तसेच याप्रसंगी सौ. प्रमिला रणवरे यांनी आरडगांव केंद्रातील शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून आरडगांव केंद्र क्रिडा क्षेत्रात व विविध स्पर्धा यामध्ये सतत आघाडीवर असते. हि कौतुकास्पद व प्रेरणादायी बाब आहे, असे मत प्रतिपादन केले.
याप्रसंगी सौ.विजया बोडके,संजय शिंदे, मधुकर शिंदे, रामचंद्र मलगुंडे, सतीश जाधव, दादा रणवरे , अर्जुन जाधव, किशोर चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक तानाजी सस्ते यांनी तर आभार संभाजी कदम यांनी मानले. सुत्रसंचलन रामचंद्र मलगुंडे यांनी केले. या कार्यक्रमास चव्हाणवाडी गावचे ग्रामपंचायत उपसरपंच चेतन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण, सासवड, हिंगणगाव, शेरेचीवाडी, हिंगणदरा, धनगरवाडी, गायकवाडवस्ती, आरडगांव, चांभारवाडी, तांबवे, सालपे, चव्हाणवाडी, परहर या शाळांतील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक उपस्थित होते. यावेळी सोशल डिंस्टशिंग, मास्क, सॅनीटायजर याचे पालन करणेत येऊन आरोग्य विभागाचे सुचनांचे पालन करणेत आले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश