अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण :
साधना साप्ताहिकाच्या वतीने ‘कोरोना काळातील आमचे शिक्षण’ या विषयावरील लेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्या चांगला प्रतिसाद मिळाला असे साधना साप्ताहिक पुणे यांनी कळवले आहे.
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांत मिळून 78 व्यक्तींनी लेखन पाठवले. त्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम करण्याची विनंती शिक्षण क्षेत्रातील मान्यवर नामदेव माळी यांना केली होती. ते सर्व लेखन वाचून त्यांनी पाच क्रमांक पारितोषिक देण्यासाठी निवडले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
१. कृष्णात पाटोळे ( जिल्हा सांगली )
२. अशोक निकाळजे ( जिल्हा बीड )
३. शीतल झरेकर ( जिल्हा अहमदनगर )
४. सुरेश आंबरे ( जिल्हा अहमदनगर )
५. वैशाली आडमुठे ( जिल्हा सांगली )
वरीलपैकी पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे पाच हजार , तीन हजार, दोन हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. ही पारितोषिके नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँक ट्रान्स्फर केली जातील.
त्याशिवाय आणखी 20 व्यक्तींना परीक्षकांनी विशेष उल्लेखनीय असे संबोधले आहे.पुढीलप्रमाणे :
उर्मिला कीर्तनकार ( हिंगोली ), रंजना सानप ( सातारा ), नम्रता पवार ( अहमदनगर ), मनीषा लबडे ( अहमदनगर ), वृषाली घोडके ( अहमदनगर ), स्मिता धनवटे ( अहमदनगर ), प्रकाश चव्हाण ( नाशिक ), श्रीकांत पाटील ( रत्नागिरी ), चंद्रकांत ठेंगे ( यवतमाळ ), नयना पाटील ( कोल्हापूर ), धनंजय कुलकर्णी ( सातारा ), विनीत पद्मवार ( गडचिरोली ), सुनील जाधव ( बीड ), तारीश आतार ( सांगली ), सारिका डांगे ( सातारा ), दादासो पाटील ( सांगली ), नकुशी देवकर ( कोल्हापूर ), हेमंत जाधव ( सातारा ), रुपाली सुतार ( कोल्हापूर ), राहुल आठरे ( अहमदनगर )
या 25 व्यक्तींचे संपादित स्वरूपातील लेखन असलेली 78 पानांची पुस्तिका साधना प्रकाशनाकडून प्रकाशित केली जाणार आहे. त्यात सर्व सहभागी 78 व्यक्तींची नावे व त्यांच्या शाळेचे / संस्थेचे पत्ते अशी यादीही असेल. या पुस्तिकेत एकूण स्पर्धेचा वेध घेणारे परीक्षकांचे विस्तृत मनोगत असेल, ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून आकाराला आली त्या डॉ. पंडित विद्यासागर यांचेही मनोगत असेल.
सर्व 78 सहभागी डॉ. पंडित विद्यासागर लिखित “ओवी गाऊ विज्ञानाची” हे पुस्तक आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची “विवेकाचा आवाज” आणि “प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे” ही अन्य दोन पुस्तकेही पाठवली जाणार आहेत. यासोबतच सर्वांना स्पर्धेतील सहभागाचे प्रमाणपत्र आणि वर उल्लेख केलेली महत्त्वाचा दस्तावेज ठरणारी पुस्तिका पाठवली जाणार आहे. या पुस्तिके काही भाग कर्तव्य साधना kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवरून 1 ते 5 नोव्हेंबर या काळात प्रसिद्ध होणार आहे.
पारितोषिकांची रक्कम , प्रमाणपत्र, पुस्तिका,भेट पुस्तके हे सर्व सर्वांना पोस्टाद्वारे रवाना केले जाणार आहे असे साधना साप्ताहिक वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कळवले आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश