खंडाळा येथे कॉग्रेस पक्षाचे सत्याग्रह आंदोलन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:
केंद्राच्या अन्यायी शेतकरी विरोधी कायद्याविरोधात ३१ ऑक्टोबरला सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीने खंडाळा तहसिलदार कार्यालय येथे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, जिल्हा प्रभारी संजय बालगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान अधिकार दिवस व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनी तसेच लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून खंडाळा तहसिलदार कार्यालय येथे आंदोलन पार पडले.
यावेळी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे,चंद्रकांत ढमाळ,गुरूदेव भरदाडे,एस. वाय. पवार,राजेंद्र डोईफोडे,शैलजा खरात,स्वाती बंडलकर,अजय धायगुडे,भरत शेळके,मस्कू आण्णा शेळके,प्रकाश गाढवे,रत्नाकांत भोसले,अतुल पवार,तारिक बागवान,अंकुश माने,सुदाम धोपटे,स्वप्नील ढमाळ,रमेश शिंदे,मनीष गाढवे,सत्यवान जाधव, किसन धायगुडे आणि खंडाळा तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व आजी-माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, आजी-माजी नगरपंचायत नगरसेवक,सर्व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.