
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत येथे राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सांगली जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस बाळासाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, युवती जिल्हाध्यक्षा पूजा लाड,जत तालुकाध्यक्ष धोडमणी,जत तालुका युवक अध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष पवन कोळी, तालुका उपाध्यक्ष आण्णाराय्या रेऊर, तालुक्याचे जेष्ठ नेते सुरेशरावजी शिंदे,मन्सूर खतीब, चन्नाप्पा होर्तिकर, पंचायत समिती उपसभापती शिवाजी शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार व इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मा.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी लोकनेते स्व. राजारामबापू पाटील व जत तालुका याविषयी सर्वांसमोर विषय मांडत जुन्या काही घटनांचा उलगडा करत, पाटील साहेबांचे जत तालुक्यावर असलेले प्रेम व ओढ याविषयी माहिती दिली व सर्वांना पक्ष वाढीसाठी, पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पुन्हा आवाहन केले. सर्वच उपस्थितांकडून या जनसंपर्क कार्यालयासाठी प्रामुख्याने प्रयत्नशील राहिलेल्या आणि अगदी कमी वेळेत जनसंपर्क कार्यालयाची उभारणी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या तालुका युवक अध्यक्ष उत्तम चव्हाण यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील कौतुक केले,आभार मानले.
यावेळी सुरेशराव शिंदे म्हणाले, जयंत पाटील यांनी जत तालुक्याकडे व तालुक्यातील विविध प्रश्नांकडे अगदी मनापासून लक्ष दिले आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी कोणतेही राजकिय स्वार्थ, हेवेदावे, मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे झालेले नुकसान भरून काढत तालुक्यातील पक्षाची ताकत वाढवण्यासाठी मूठ बांधली पाहिजे आणि हे सध्या गरजेचे आहे.
उत्तम चव्हाण यांनी आभार मानले.कार्यालयासाठी प्रयत्न करणाऱ्या युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोकजी कोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन कोळी, हेमंत खाडे, जयंत भोसले, बंटी नदाफ, रुपेश पिसाळ यांचे देखील आभार मानले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन