प्राथमिक शिक्षकांचे वेतन 1 तारखेला करा: शिक्षक भारतीची मागणी

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार 1 तारखेला करण्यात यावेत, असा शासन निर्णय असतानाही राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार 1 तारखेला होत नाहीत. शिक्षकांचे पगार वीस दिवस उशिरा होत आहेत. शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्याने शिक्षक बँक ,पतसंस्था यांची कर्जे असतात, पगार वेळेत झाले नाहीत तर व्याजाचा बूर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे.पगार करण्याची प्रक्रिया जिल्हा स्तर, पंचायत समिती, केंद्रस्तर अशी असल्याने पगार वेळेत होत नाहीत, यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी शिक्षक भरतीतर्फे शिक्षण सहसंचालक यांच्याकडे करण्यात आली आहे.
1 तारखेला पगार अदा न होणारे जिल्हे,शाळा माहिती घेऊन विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांना शालेय शिक्षण विभागाच्या 2 आॅगस्ट 2019 च्या शासन निर्णयाने कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारासंदर्भात सी.एम. पी.प्रणाली राबविण्यात यावी अशी मागणी सहसंचालक यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी सहसंचालक दिनकर टेमकर यांनी लवकर सी एम पी प्रणाली राज्यात सुरू करू असे सांगितले
यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष महेश शरणाथे, कृष्णा पोळ, सुरेश खारखांडे, दिगंबर सावंत, नंदकुमार पाटील व पदाधिकारी उपस्थित होते
.