नीट परीक्षेत सुयश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान: आ.राम सातपुते

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माय नेशन माय करियर या भूमिकेतून सामाजिक संवेदना जागृत ठेवून माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट 2020 च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या आई-वडिलांबरोबर तालुक्याचे नावही उज्ज्वल केले असल्याने या सर्व विद्यार्थ्यांचा माझ्यासह तालुकावासियांना अभिमान वाटतो, असे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी नीट 2020 च्या विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभ प्रसंगी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष अॅड.एम एम मगर ,डॉ. तानाजी कदम ,एनजीओ नर्सिंग ब्युरो चे प्रमुख डॉ. राहुल जवंजाळ अॅड. जी. पी. कदम डॉ. दिलीप वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते .
माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार अॅड. जी. पी.कदम यांच्या वतीने सन 2020 च्या नीट परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या माळशिरस तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पुढे बोलताना आमदार सातपुते म्हणाले, काळानुरूप माणसांची जीवनशैली बदलली. आहाराबाबतची जागरुकता कमी झाली आणि वैद्यकीयसेवा देणाऱ्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली. सुरुवातीस शहरातूनच तयार होणारे डॉक्टर सध्या ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सध्या वडिलांच्या नावाने नीट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची ओळख होत आहे.परंतु भविष्यात हेच विद्यार्थी मोठमोठे डॉक्टर होऊन हे डॉक्टरांचे वडील आहेत या नावाने ओळख होणार आहे हे खरोखरच अभिमानास्पद आहे .
यावेळी अॅड. जी. पी. कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सातपुते यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी खडतर परिस्थितीतून नीट परीक्षेत 675 गुण मिळविणाऱ्या गोविंद विजयकुमार कानडे या विद्यार्थ्यांनेही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोविंद कानडे , अनुष्का सूळ , यश पानसरे , शुभम मोहिते, प्रणाली पाटील , राजश्रीदेवी पाटील , विशाल सरगर , धीरज वाघमोडे , मृणाल पवार , अथर्व धोकटे , शिवानी वाघ, व डॉ. विकास मगर यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. जी. पी. कदम ,सूत्र संचालन डॉ. विकास मगर तर आभार प्रदर्शन संजय हुलगे यांनी मानले.

    हल्ली मुलांच्या आवडीनिवडी न पाहता  पालकांकडून मुलांवर अपेक्षांचे ओझे लादले जात आहे,हेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मोठा अडसर ठरत असून सर्व पालकांना माझी विनंती आहे की ज्याला ज्या क्षेत्रामध्ये रुची आहे त्या क्षेत्रामध्ये त्या त्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी द्याव्यात अन्यथा मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागून मुले  प्रवाहातून बाजूला फेकली जातात आणि यानंतर कुटुंबावर होणारा आघात मोठा असतो. यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे आपल्या मुलांवर लादू नका .
                डॉ. एम. के. इनामदार, हृदयरोग तज्ञ