नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज,माळशिरस या विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. एन.टी.बी यांच्या मार्फत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत श्रीनाथ विद्यालयाचे विद्यार्थी अजिंक्य ठरले.यामध्ये प्रामुख्याने चि.विशाल सरगर (५६२) व चि.आशिष माने (५५३) गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांचा सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विजय सरगर, रामचंद्र सरगर, जगन्नाथ मोटे, प्राचार्य योगेश गुजरे, महेंद्र उंडाळे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.