
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दहा तालुक्यांमध्ये विविध प्रश्नासंदर्भात आत्मचिंतन व सामाजिक समस्या, स्थानिक समस्यांबरोबर जनजागृती अभियान तसेच जिल्हा मेळावा संदर्भात प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत सांगली जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी चर्चा व आत्मचिंतन करणार आहेत.
सदर अभियान शनिवारी सुरू होणार असून जत-शनिवार दिनांक सकाळी अकरा वाजता, कवठेमंकाळ शनिवार दुपारी चार वाजता, विटा रविवार सकाळी अकरा वाजता.खानापूर दुपारी चार वाजता, पलूस सोमवार सकाळी अकरा वाजता. कडेगाव दुपारी चार वाजता,शिराळा मंगळवार सकाळी अकरा वाजता , वाळवा मंगळवार दुपारी चार वाजता, मिरज सांगली व कुपवाड शहर बुधवार सकाळी दहा वाजता, तासगाव बुधवार दुपारी तीन वाजता.
सदरच्या अभियानामध्ये शासनाला विविध मागण्याचे निवेदन देण्यात येणार असून त्यामध्ये प्रमुख्याने सांगली जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली,ह्यामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.सोयाबीन, मुग, तुर, द्राक्षे,ऊस, भाजीपाला असे अनेक हातातोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे.त्यामुळे अन्नदात्या शेतकऱ्याची उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने ताबडतोब पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व त्यांना त्वरित शासकीय मदत मिळावी व तीसुद्धा डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी.
सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी बघता अनेक ओढे, नाले,पाण्याखाली गेले होते. यामध्ये जीवित व मनुष्यहानी झाली. तरी अशा ओढे नाल्यावरील फुलाची उंची वाढवून जीवित हानी टाळावी,
सुशिक्षित बेरोजगारांना त्वरित रोजगार उपलब्ध करून द्यावा व सुशिक्षित बेरोजगार भत्ता सुरू करावा,
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती देण्यात यावी.कारण कष्टकरी शेतमजूर व शेतकरी अतिवृष्टीमुळे हलाखीचे जीवन जगत आहे.
गरीब कष्टकरी महिलांनी लघु उद्योगासाठी किंवा इतर घरगुती अडचणीसाठी मायक्रो फायनान्स व बचत गटामधून कर्जप्रकरणे केली होती.परंतु covid 19 मुळे व अतिवृष्टीमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने कर्जदार महिला ह्या कंपन्यांच्या वसुली अधिकारी यांच्या त्रासाने वैतागल्या असून आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सदरची सक्तीची वसुली त्वरित थांबवावी. ह्या व तालुक्यातील स्थानिक समस्या शासकीय निधी संदर्भात चर्चा करणे त्याचबरोबर कामगारांच्या समस्या व रोजगार तसेच मागासवर्गीयांचे बँक प्रकरणे मंजूर करणे व अन्याय करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणे, तसेच पक्षवाढी संदर्भात चर्चा करणे,10 तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करणे,तसेच वरील मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा पक्षाच्यावतीने आयोजित करणे.यासंदर्भात सांगली जिल्हा जनजागृती अभियान व नियोजन करण्यासाठी दिनांक 18 -10 -20 रोजी जत येथील गेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी रिपाईचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक रावजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकारणी सदस्य डॉ. रवी कुमार गवई,मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे,मिरज तालुका अध्यक्ष युवा आघाडी नंदकुमार कांबळे,जत तालुक्याचे अध्यक्ष युवा आघाडी संकेत कामत व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन