
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
रेवनाळ येथील लोकनियुक्त सरपंच धनाजी बाबासाहेब पाटील यांच्याविरोधात 9 विरुद्ध 0 ने अविश्वास ठराव तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे दाखल झाला. ग्रामपंचायत निवडणूक नोव्हेंबर 2017 मध्ये झाली होती. सरपंचाकडून विकास कामे होत नसल्याच्या कारणावरून लोखंडे व वाघमोडे गटाच्या सदस्यांनी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. दरम्यान जर निवडणूक झाली तर नव्या कायद्यानुसार होणार आहे.यात अविश्वास ठराव मंजूर झाला, तर ग्रामसभेची तरतूद वगळण्यात आल्याने सदस्यातून निवडणूक होणे शक्य आहे.दरम्यान याबाबत तहसीलदार सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,अविश्वास ठराव दाखल झाला आहे. पुढील कारवाई निवडणूक त्याच्या निर्देशानुसार होणार आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन