संजय हुलगे
माळशिरस/ प्रतिनिधी :
मोहिते-पाटील यांनी धनगर समाजाला नेहमी झुकतेच माप दिले आहे.त्यांनी कधीच जातीपातीचे व समाजात तेड निर्माण होईल असे कधीच केले नाही. ढोल बजाओ सरकार जगाव हे आंदोलन केले.माळशिरस तालुक्यातील किती धनगर समाज एकवटला होता , किती धनगर समाज बांधवांना आपण घेऊन आंदोलन केले असे माजी उपसभापती किशोर सुळ, मामासाहेब पांढरे व हणुमंत सरगर यांनी पञकार परिषदेत बोलताना सांगितले.यावेळी अकलुज कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,गणपतराव वाघमोडे,हणमंत सरगर बाजीनाना सरगर , अॅड.धनाजी ठवरे , उमेश कांबळे, राहूल वाघमोडे , रामभाऊ माने , हणुमंत पाटील , लिंगा पाटील , भिमराव काळे, संजय वाघमोडे , नामदेव ठवरे , दत्तात्रय वाघमोडे आदि उपस्थितीत होते.
पुढे बोलताना किशोर सुळ, मामासाहेब पांढरे व हणुमंत सरगर म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी धनगर समाजाला पहिल्यांदा सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिले. त्यांनी धनगर समाजातील धनगर नेत्यांना जिल्हा उपाध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती , पंचायत समिती उपसभापती , पंचायत समिती सदस्य व त्यांच्या सर्वच संस्थे मध्ये उच्च पदे दिली आहेत.केवळ स्टंटबाजी म्हणून धनगर समाजाला सहानुभूतीची गरज नाही हे बालिष वक्तव्य करण्याच्या अगोदर आपण कोण आहोत आंणि आपण कोणाविषयी बोलतोय याचे भान ठेऊन वक्तव्य करणे गरजेचे होते.आपली ..नसताना आपण मोहिते पाटील यांच्यावर बोलणे एवढी आपली तेवढी.. नाही याचे भान ठेवावे, असा टोला ही हणमंत सरगर यांनी लगावला.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पर्यटन व विकास मंञी असताना त्यांनी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टी उभारली हे माजी मंञी आण्णा डांगे यांना ज्ञात आहे. मोहिते पाटील यांच्यावर टिका करणाऱ्यानी जर चौंडी येथील शिल्पसृष्टी बघितली नसेल तर बघून या, जाण्या येण्याचा खर्च नसेल तर मागू घ्या.आपली …. नसताना मोहिते पाटील यांच्यावर टिका करण्याचा अधिकार काय आहे ? आपल्याला माळशिरस तालुक्यातील किती धनगर समाज ओळखतो हे अगोदर बघा.अशी बालिशपणाची वक्तव्य करून समाजाचे हित जोपासले जात नाही.मोहिते पाटील यांनी धनगर आरक्षणासाठी पाठिंबा दिला म्हणून तुमच्यासारख्या समाज विरोधीला खटकन्याचे कारणच काय ?आपण आंदोलनासाठी किती धनगर समाज बांधवाना घेऊन आलता? याचे तरी भान ठेवावे.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नांव देण्यासाठी माळशिरस पंचायत समितीच्या वतीने ठराव करून सभापती व उपसभापती यांनी निवेदन दिले.हे निवेदन देणारी महाराष्ट्रातील पहिली माळशिरस पंचायत समिती ठरली.तर तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीपैकी 85 ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन ते शासनाला देण्यात आले व अखेर सरकारने सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले.यानंतर माळशिरस तालुक्यातील धनगर समाज बांधवानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला. ऑगस्ट 2019 रोजी पंढरपूर येथे धनगर आरक्षणासाठी उपोषण सुरू होते त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तेथे जाऊन पाठिंबा दर्शविला होता. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार असतात संसदेत धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठविला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेऊन चर्चा करून पञ ही दिले होते. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरयांना शेती महामंडळाच्या जमिनी मिळवून दिल्या त्या मध्ये बरेच शेतकरी बांधव धनगर समाजाचे होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन