वाघ्या-मुरळी परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन!

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

वाघ्या- मुरळी परिषदेच्या वतीने बहुजनांचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा नेते शेखर रणदिवे,आबासाहेब कोकरे उपस्थित होते.हे निवेदन वाघ्या मुरळी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बजरंग वाघमारे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रणदिवे, जिल्हा सरचिटणीस मधूकर माने, संपर्क प्रमुख दत्ता मलमे,आटपाडी तालुका अध्यक्ष सागर रणदिवे, उपाध्यक्ष समाधान वाघमारे, खानापूर तालुका अध्यक्ष मल्हारी बंडगर, बाळू जाधव, प्रविण केंगार, अतुल रणदिवे, व वाघ्या मुरळी कलावंत यांनी दिले. सर्व कलावंत वाघ्या मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. या कलावंतांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपूरावा करण्याचे आश्वासन आमदार पडळकर यांनी दिले.