
अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ फलटण:
फलटण तालुक्यात दसरा सण पारंपारिक पद्धतीने दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होतो. पण यावर्षी कोविड-१९ च्या महामारीमुळे फलटण शहरासह गिरवी,साखरवाडी,तरडगांव,आरडगांव,आदर्की,बरड, गोखळी,आसू,राजूरी,गुणवरे,विडणी,निंभोरे,जिंती,सांगवी या ग्रामीण भागातही दसरा सण साध्या घरगुती वातावरणात साजरा झाला. कोराणाचे सावट दसरा सणावर पडले होते. बाजारपेठ व छोटे व्यवसायीक याची जेमतेम विक्री झाली तर सोनेचांदी व्यवहार चांगले झाल्याची बातमी आहे. दसरा सणाची अनेक वर्षाची गावोगावी होणारी आपट्याच्या पानांची सोने लुटण्याची व देवाला, भावकीला, नातेवाईक, शेजारी सोने वाटण्याची परंपरा खंडीत झाली. त्याबदल जेष्ठ नागरिक व अभ्यासू नागरिक यांनी खंत करीत कोरोना कधी संपणार असा संताप करीत होते.कोरोनामुळे सण व उत्सव यांचेवर विपरीत परिणाम झाल्यामुळे सामाजिक चिंता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु