ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले यांच्या जयंतीनिमित्त रंगले ऑनलाईन कवी संमेलन!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ठाणे:

फुले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विचारवंत, कवी, लेखक, निर्भीड वक्ते, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक, दलित पँथरचे संस्थापक दिवंगत राजा ढाले यांच्या ८० व्या जयंती निमित्त ३० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ०४:०० वाजता, ऑनलाईन कवी संमेलन अनुसुख फाऊंडेशन ठाणे यांच्या वतीने घेण्यात आले होते. त्यात राजा ढाले यांच्या कविता, लिखाण आणि आठवणींना उजाळा देण्यात आले.
राजा ढाले यांचे आंबेडकरी चळवळीत स्थान उच्च कोटीतले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही, भल्या भल्ल्यांची भंबेरी उडविण्याचे बौद्धिक सामर्थ्य त्यांच्या ठायी होते. टोकदार युक्तिवाद करत प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडण्याचे त्यांचे धैर्य अनोखे होते. अखेरचा एक जरी माणूस उरला तरी त्यानं समतेसाठी लढलं पाहिजे ही राजा ढाले यांची भूमिका त्यांच्या अतूट बांधिलकीची साक्ष देत. आजच्या आंबेडकरी तरुणांना राजा ढाले नेहमी प्रेरणादायी राहतील असे व्यक्तव्य अनुसुख फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी या ठिकाणी व्यक्त केले याप्रसंगी कवी श्रीकृष्ण टोबरे, जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, मिलिंद जाधव, नरेश जाधव, चेतन जाधव, वृषाली माने यांनी स्वरचित कविता सादर केल्या.