लोणारी समाज सेवा संघ मुंबईने पुन्हा हाती घेतला समाजसेवेचा वसा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

 लोणारी समाज सेवा संघ मुंबई संचलित श्री. विष्णूपंत रामचंद्र लोणारी (दादरे) गुरुकुल विद्यालय मापटेमळा आटपाडी विद्यालय सन 2005 पासून शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आटपाडी पंचक्रोशी व संपूर्ण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण यशाची उज्वल कामगिरी करत सातत्याने उत्कृष्ट  प्रकारची समाज सेवा करत आलेले आहे. आज संपूर्ण जग कोरोना (covid-19) च्या महामारीशी लढत आहे. रुग्णांसाठी सध्या बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन लोणारी समाज सेवा संघ मुंबई संस्थेच्या “समाजसेवा हीच ईश्वर सेवा” या ब्रीद वाक्याप्रमाणे कोरोना रुग्णांवर उपचार करणे करता covid-19 हॉस्पिटल उभारण्यासाठी विद्यालयातील 7200 चौरस फूट क्षेत्रफळाचा सुसज्ज डायनिंग हॉल प्रशासनाला देऊन सहकार्य केले आहे.

 आटपाडी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराअभावी  प्राण गमवावे लागू नयेत. ही गरज ओळखून तालुक्यात सर्वप्रथम समाजसेवेचे व्रत हाती घेऊन लोणारी समाज सेवा संघ मुंबई ने  चांगला आदर्श निर्माण करून दिलेला आहे. या हॉस्पिटलचा आटपाडी पंचक्रोशीतील कोरोना बाधित रुग्णांना  लाभ होणार आहे. असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करून  प्रशासनाला सर्वतोपरी मदत केलेली आहे.