
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यातच गेल्या 20 सप्टेंबर रोजी जतचे प्रसिद्ध अर्थोपेडीक डॉ.मकसूद तांबोळी यांचा कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आला होता .यामुळे त यांचे हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले होते . डॉक्टर यांनी घरीच व्यवस्थित रित्या ट्रीटमेंट घेऊन covid-19 या रोगा वरती मात करून पुन्हा एकदा रुग्णाच्या सेवेत आपले हॉस्पिटल चालू करून सेवा बजावत आहेत. मकसूद तांबोळी यांनी विविध व्यवस्थित रीता औषधोपचार करून व प्रशासनाच्या सूचनेनुसार ट्रीटमेंट घेतल्याने कोरोणा या आजारावर मात करून त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये आगमन केले. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात व मित्र परिवारामध्ये आनंदाचा वर्षाव होत आहे त्यांनी कोरोणा या रोगा वरती मात करून आल्याबद्दल हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफ यांनी हार व गुलाब पुष्प देऊन मोठ्या दिमाखात सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ मकसूद तांबोळी बोलताना तालुक्यातील तमाम माझ्या वरती विश्वास दाखवणाऱ्या तमाम नागरिकांना कळविण्यात येते की आमचे हॉस्पिटल सर्व सोयींनी युक्त सध्या चालू करण्यात आले आहे तरी आपले कोणती आर्थोपेडिक संबंधित आजारावरती आमच्या हॉस्पिटलचे भेट घ्या व डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून घ्या असे आव्हान करण्यात आले.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर