
पोपट वाघमारे
दिघंची/ वार्ताहर:
दिघंची (ता. आटपाडी) येथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे मुस्लीम समाजाच्या मोहम्मदिया मर्कज ट्रस्टच्यावतीने दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक कार्यकर्ते मुजफ्फर आतार,प्रसिद्ध कापडाचे व्यापारी हारुणशेठ तांबोळी,अॅड.अशपाक आतार,अखील आतार सज्जाद आतार यांनी मल्टीविटामिन 2000 गोळ्या होम आयसोलेशन पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्य अधिकारी डॉ. विनायक पवार, औषध निर्माण अधिकारी जहांगीर आतार यांच्याकडे सुपूर्द केल्या.
यावेळी आरोग्यसेविका रिजवाना शेख ,स्वाती नागरगोजे, अनिल चौरे ,बनसोडे मॅडम, अमोल आरबळे, जयश्री खरात उपस्थित होते.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुस्लिम समाजातील व्यक्तींनी अनेक दिवस येथील गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे,अशातच मोहम्मदिया मर्कज ट्रस्टच्यावतीने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विटामिन च्या 2000 गोळ्यांचे किट प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून आणले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर