जतचे तहसीलदार सचिन पाटील,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे कोरोनामुक्त !

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी:

जतचे तहसीलदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्रअण्णा वाघमोडे यांनी कोरोनावर मात करून कोरोनामुक्त झाले.त्यांनी पुन्हा आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
कोरोना महामारीतून मुक्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र (अण्णा) वाघमोडे यांचे स्वागत सत्कार करताना रेवनाळ गावातील पोलीस पाटील बिरुदेव वाघमोडे,सोसायटी चेअरमन आबासाहेब पुजारी, उपसरपंच मनोहर वाघमोडे,माजी उपसरपंच मारुती वाघमोडे, शिवाजी कटरे,एम.बी.लोखंडे,ए.बी.लोखंडे,संजय खांडेकर, शहाजी कटरे,मायाप्पा वाघमोडे,गावडे सर यांच्यासह माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी कोरोनावर मात करून जनतेच्या सेवेसाठी तहसील कार्यालयमध्ये रुजू झाले.त्यांची शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे यांनी भेट घेतली. त्यांना पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी लिंबाजी माळी,सावकार माडग्याळ, जेटलींग कोरे, शिवसेना उपविभाग प्रमुख सुखदेव माळी माडग्याळ, शिवाजी बागल शिवसेना शाखाप्रमुख बागलवाडी उपस्थित होते.