उद्धवा !अजब तुझे सरकार,लहरी राजा,प्रजा आंधळी ? ग.दि.माडगूळकर यांची १०१ वी जयंती निमित्ताने…

नंदकुमार विभुते
माडगुळे/ प्रतिनिधी :

आज १ आॅक्टोबर म्हणजे थोर साहित्यिक,आधुनिक वाल्मिकी,कवी,गीतकार गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांची १०१ वी जयंती निमित्ताने…
ज्या व्यक्तीने आपल्या नावाबरोबरच आपल्या गावाचे एव्हाना तालुक्याचे नाव अजरामर केले,आपले कुलकर्णी आडनाव बदलून माडगूळकर हे आपल्या गावाचे नाव लावले त्या व्यक्तीसाठी गावाने,तालुक्याने काय केले ?शासनाने काय केले ?हा प्रश्न निर्माण होतो. गेल्या वर्षी ग.दि.माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्याच जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाने माडगुळे येथे तसेच आटपाडी येथे भव्य स्मारक उभे करण्यासाठी भरपूर निधी जाहीर केला. परंतु आज काहीच दिसत नाही.त्यांचा निधी हा कागदावर मर्यादित राहिला.
व्यंकटेश माडगूळकर,ग.दि.माडगूळकर, भा. दि.माडगूळकर,श्रीधर माडगूळकर,आनंद माडगूळकर या एकाच घरातील या साहित्यिकांनी ज्या घरात जन्म घेऊन आपली लेखणी चालवली व आपल्या गावाचे नाव व आपल्या तालुक्याचे नाव सातासमुद्रापार नेले असे त्यांचे हे राहते घर आज शेवटची घटका मोजत आहे.त्याकडे शासनाने, शासनकर्त्यांनी जराही लक्ष घातले नाही. या थोर साहित्यिकांनी ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी एक मोठे स्मारक करता येत नसेल तर एक छोटे स्मारक बांधून त्या साहित्यिकांच्या स्मृतीस, आठवणींना उजाळा मिळावा असे संपूर्ण साहित्यकारांची तसेच गावकऱ्यांची मागणी आहे.