
माळशिरस,प्रतिनिधी/संजय हुलगे :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानाच्या रक्षणार्थ शिवराज पुकळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता .तसेच विविध संघटना यांनी आंदोलन केले. याची दखल घेत व्हर्जिन भास्कर या वादग्रस्त वेब मालिकेच्या निर्मात्या एकता कपूरने माफी मागत यासंदर्भातील वादग्रस्त व्हिडिओ हटवला आहे. उद्या होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. हा धनगर समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचे शिवराज पुकळे म्हणाले.
अटल बालाजी वाहिनीवर एकता कपूर निर्मित व्हर्जिन भास्कर या वेब मालिकेचे प्रसारण केले जात होते.या मालिकेतून मुलींच्या एका वसतीगृहात चालणाऱ्या गैरप्रकाराचे दर्शन घडवण्यात येत होते.मुलीच्या यावस्तीगृहाचे नाव अहिल्याबाई महिला छात्रावास असे ठेवण्यात आले.यावर शिवराज पुकळे यांच्यासह धनगर समाजाने तीव्र आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला होता.
अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा भंजनाच्या या प्रकारामुळे देशभरातील 20 कोटी धनगर समाजचं नाही, तर अहिल्याबाई होळकर यांना मानणारा वर्गही संतप्त झाला आहे. त्यांच्या भावनांना धक्का बसला आहे. असे स्पष्ट करत शिवराज पुकळे म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. पुण्यश्लोक आहिल्याबाई या आमच्यासाठी देवी समान आहेत. त्यांची अपप्रतिष्ठा करण्याच्या प्रयत्नामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला होता. परंतु एकता कपूरने माफी मागितली व वादग्रस्त व्हीडियो डिलिट केल्यामुळे अंदोलन मागे घेतले असे पुकळे यानी सांगितले.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु