जतमध्ये कोविड सेंटरचे आमदार सावंत यांच्याहस्ते उद्घाटन

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी:

जत येथे सामाजिक न्याय विभागाच्या अनु-जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवाशी शाळा येथे इंडियन मेडिकल असोसिएशन जत यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरचे उदघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.येथे 50 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई,इंडियन मेडिकल असोसिएशन जत अध्यक्ष डॉ.रोहन मोदी,उपाध्यक्ष डॉ.शरद पवार,डॉ.काळगी,डॉ.गुरव, जत मंडल अधिकारी संदीप मोरे,तलाठी रवींद्र घाडगे व सर्व पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.