
गुरुनाथ तिरपणकर
बदलापूर/ प्रतिनिधी:
कोरोना वायरसच्या धुमाकुळामुळे आपली कामाची गती मंदावली आहे. लहान लघु उद्योग, मोठे उद्योग, कॉलेज, शाळा सर्व ठिकाणी कोरोना महामारीचा परिणाम झाला आहे. 7 ते 8 महिने झाले आपण कोरोना या आजाराशी सर्वजण लढा देत आहोत. त्यामुळे या कोरोना परिस्थितीमुळे सर्व शक्य होईल त्या उद्योगांचे काम , शाळा, कॉलेज मधील शिक्षण हे घरीच ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. पण काही गरजू लोकांच्या घरी कॉम्पुटर किंवा मोबाइल आजही नाही. त्यामुळे अश्या काही मुलांना शिक्षण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायला त्रास होतो .शिक्षण घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. तो त्रास किंवा अडथळा होऊ नये म्हणून प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती गावकर यांनी गरजू शालेय विद्यार्थी रोहन अशोक मिसळे रा. बदलापूर या शालेय मुलाला दीप्ती गावकर यांची स्वतःचा कॉप्युटर देऊन त्याला सहकार्य केले. जेणेकरून त्याला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता येईल व त्याचे शालेय वर्षाचे नुकसान होणार नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रेरणा फाउंडेशनच्या उपखजिनदार दिव्या गांवकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सुनीता मिसळे व शुभांगी सातपुते उपस्थित होत्या. प्रेरणा फाउंडेशनचे कार्य चालूच आहे, परंतु लॉकडाऊनमुळे व गेले सहा महिने गोरगरिबांना मदत पुरवत आहे. परंतु प्रेरणा फाउंडेशनला लोकांकडून किंवा राजकीय पक्ष्याकडून अजूनपर्यंत कोणतीही मदत मिळत नाही. अनेक लोक मदत मागण्यासाठी येतात. पण मदत करणारा कोणीही येत नाही. अशी खंत प्रेरणा फाउंडेशनच्या अध्यक्षांनी व्यक्त केली . तरी आपल्या परीने प्रेरणा फाउंडेशनचे काम मी चालू ठेवेन असेही अध्यक्षांनी सांगितले. प्रेरणा फाउंडेशन आपल्या परीने गोरगरिबांच्या सेवेत हजर असेल .

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश