
आटपाडी/प्रतिनिधी:
आटपाडी पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. गटविकास अधिकारी यांनी सर्व शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले व शिक्षकांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत याची प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात येईल असेही सांगितले.जे शिक्षक सध्या मुख्यालयी नाहीत, त्यांच्यावर कालच शिक्षण विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यावर चर्चा केली असता त्यांनी कोणावरही कारवाई केली जाणार नाही,परंतु शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
काही शिक्षक बंधू-भगिनींना अति तातडीच्या समस्या असतील तर त्यांना त्यातून वगळावे व अनेक शिक्षक दूर अंतरावर असल्याने त्यांना येण्यास विलंब होणार आहे,तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये,अशी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली. तेव्हा गट विकास अधिकारी यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच प्रशासन चालवले जाईल. विनाकारण कोणावरही कारवाई होणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव ,तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे , डॉ. आंबेडकर शाहू, फुले, सह . रुग्णालय संचालक श्रीकांतराजे कुंभार ,आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, प्रवीण बाड ,संजय कबीर, अजय राक्षे , दत्तात्रय सुतार ,संतोष ऐवळे व श्रीरंग वायदंडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश